कांजूरमार्ग येथे ओमकारेश्वर देवालय ट्रस्टच्या वतीने सीड बॉल्सचे रोपण
मुंबई : कांजूरमार्ग डॉकयार्ड कॉलनीतील ओमकारेश्वर देवालय ट्रस्ट यांच्या वतीने (Sunday 26th June)सीड बॉल्सचे रोपण करण्यात आले. राष्ट्र सेवा दल मालवणी शाखेच्या वतीने सिड बॉल कार्यशाळा घेण्यात आली होती. यावेळी तयार झालेले 300 सीड बॉल्स राष्ट्र सेवा दलाचे निसार अली यांच्या वतीने नारायण प्रभू यांना देण्यात आले. हे सिड बॉल्स आज लावण्यात आले. तसेच जांभळाच्या बिया आणि सुपारीची 7 रोपे लावण्यात आली.
शरद बिरमोळे, नारायण प्रभू, आपले पर्यावरण या न्यूज वेबसाईटचे संपादक प्रशांत गायकवाड, दिपक शिरवणकर, गणेश सणस, पीएम पाटील, सिंग, जयंत चिपकर, श्रीधर टक्केकर, सुकेश कुमार, वेणू यावेळी उपस्थित होते. शिवराम वराडकर, गावकर, प्रजापती, मिलिंद सावंत, अजय सावंत, साहू, उल्हास चिपकर यांनी याआधी सहभाग नोंदवला आहे.