मुंबई, 13 ऑगस्ट : मध्य रेल्वेवरील विशेष स्वच्छता मोहिमेमध्ये विभागांतील सर्व ठिकाणी स्वच्छता कार्य पूर्ण जोमाने सुरू करण्यात आले.
ईएमयू पीओएच कार्यशाळेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सफाई कामांमध्ये सर्व कर्मचार्यांचा सक्रिय सहभाग. न्यूमॅटीक विभाग, पुनर्वसन व ट्रॉली विभागात संकलित केलेला कचरा वेगळा करणे व योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची खात्री करण्यात आली.
माटुंगा कार्यशाळेतील कर्मचार्यांनी परिसर स्वच्छ दिसावे म्हणून ट्रॅक्स मधील तण काढणे, पावसाळ्यात उगवलेली अवांछित झुडपे आणि गवत स्वच्छ करीत स्वतः हून सहभाग घेतला.
वडाळा रोड स्टेशनच्या आवारात श्रमदान आयोजित करण्यात आले होते ज्यात वरिष्ठ परिचालन व्यवस्थापकांसह सुमारे ३५ कर्मचारी व प्रवाशांचा सहभाग होता. साफसफाईचे काम वडाळा रोड, शीवडी आणि कुर्ला स्थानकांचे उप स्टेशन व्यवस्थापकांनी संयुक्तपणे पार पाडले. कर्जत, इगतपुरी आणि किंग्ज सर्कल स्थानकांवरही साफसफाईचे कार्य प्रभावी पद्धतीने राबविले गेले.
मुंबई व इतर विभागातील कोचिंग आगार, मध्य रेल्वेच्या कार्यशाळांमध्ये रेल्वे आणि कोचिंग आगारांची गहन साफसफाई करण्यात आली.