‘महाराष्ट्राची पर्यावरण समृद्धी आणि आव्हाने’ या विषयावर रविवारी पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांचे व्याख्यान
नवी दिल्ली, दि. २३ : प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड हे “महाराष्ट्राची पर्यावरण समृद्धी आणि आव्हाने” या विषयावर रविवार, २५ एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे ३६ वे पुष्प गुंफणार आहेत.
महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने १९ मार्च २०२१ पासून “महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला” सुरु आहे. या व्याख्यानमालेत २५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता उदय गायकवाड विचार मांडणार आहेत.
उदय गायकवाड यांच्या विषयी
उदय गायकवाड हे पर्यावरण तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते म्हणून सर्वपरिचित आहेत. वाणिज्य, पत्रकारिता आणि पर्यावरणशास्त्र या विषयांमध्ये त्यांनी पदवी संपादन केली आहे. श्री.गायकवाड यांनी १९८२ पासून सामाजिक कार्यास सुरुवात केली. नर्मदा आंदोलन आणि पश्चिम घाट बचाव आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. १९८८ मध्ये त्यांनी निर्माल्य व मूर्तीदान चळवळ सुरु केली. श्री.गायकवाड हे गेल्या २५ वर्षांपासून कोल्हापुरातील पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करीत आहेत. या विषयाचा त्यांनी शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून कायदेशीर मांडणी केली आहे मुंबई उच्च न्यायालयाकडून त्यांची या विषयावर तज्ज्ञ म्हणून नेमणूक झाली होती.
कोल्हापूरातील रंकाळा तलाव संरक्षण व संवर्धनासाठी त्यांनी यशस्वी लढा दिला. केंद्रीय व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने त्यांनी कृष्णा व कोयना खोऱ्यातील २७ नद्यांचा पर्यावरण विषयक अभ्यास केला. वर्ष २०१२ ते २०१६ या कालावधीत त्यांनी पर्यावरण विषयक सद्य:स्थिती अहवाल तयार केला.
कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिराच्या किरणोत्सव अडथळे शोध समिती आणि तापमान आद्रता रोखण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे सदस्य म्हणून श्री.गायकवाड यांनी कार्य केले आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने गठीत कोल्हापूर जिल्हा व कोल्हापूर महानगर पालिकेच्या हेरीटेज समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य पाहिले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रूजविण्यासाठी विज्ञान प्रबोधनीच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयांमध्ये ‘चमत्कारामागील विज्ञान’ या प्रात्यक्षिकांसह सादर होणाऱ्या कार्यक्रमाचे ५ हजारपेक्षा अधिक प्रयोग केले आहेत. गड-किल्ले संवर्धन, अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीतही त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे.
समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण
रविवारी, 25 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल, फेसबुक आणि युट्यूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/