रत्नागिरी सीए इन्स्टिट्यूट, बीसीएच्या एनएसएसतर्फे वृक्षलागवड
रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या 70 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे शिरगाव येथील महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या बीसीए महाविद्यालयाच्या आवारात रोपांची लागवड करण्यात आली. या वेळी 25 नारळ, पोफळीची रोपे लावण्यात आली.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. झाडांची निगा राखण्याचे काम विद्यार्थिनी करणार आहेत. या वेळी सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए अँथनी राजशेखर, उपाध्यक्ष सीए बिपिन शहा, सचिव सीए आनंद पंडित, माजी अध्यक्ष सीए भूषण मुळ्ये, विकासा चेअरमन प्रसाद आचरेकर, प्रभारी प्राचार्य स्नेहा कोतवडेकर, एनएसएसचे कार्यक्रमाधिकारी तस्मीन मुजावर, प्रकल्प समन्वयक मिलिंद तेंडुलकर आदींसह सीए मंदार गाडगीळ, अभिजित चव्हाण, ऋषीकेश फडके, अभिजित पटवर्धन, शैलेश काळे, सीए अनुप शहा, सीए वरद पंडित आणि प्राध्यापक, एनएसएसचे विद्यार्थी उपस्थित होते.