रत्नागिरी, (आरकेजी) : मानवी वस्तीत घुसू पाहणार्या साडेसात फ़ुट मगरीला स्थानिक तरुणांनी पकडले आणि वनविभागाच्या ताब्यात दिले. गुहागर शहरातील वरचापाट भंडारवाडा परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर ही मगरीला आली होती.
समुद्रावर फेरफटका मारत असताना आरेगावातील अनिकेत भोसले, स्मितेश भोसले, स्वराज देवकर, आकाश भोसले, प्रतीक महाकाल यांना मगर दिसली. ती लोकवस्तीच्या दिशेने जात होती. रहिवाशांना त्रास होऊ नये व मगर सुरक्षीत राहावी, यामुळे या तरुणांनी तातडीने दोरीच्या सहाय्याने मगरीला पकडले. ती आरे येथून येणाऱ्या नदीतून आली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मगरिला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. गुहागर-चिपळूण मार्गावरील तांबी येथील धरणामध्ये तिला सोडण्यात आले.