नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अ मित शहा यांनी आज नवी दिल्लीत तुघलकाबाद इथे दिल्ली सायकल वॉकचे भूमीपूजन केले. या प्रस्तावित सायकल वॉकमुळे नवी दिल्लीतले वायु प्रदुषण 20 टक्के कमी होईल, असे गृहमंत्री म्हणाले. या सायकल वॉकमुळे सायकल सारखी वाहतुकीची हरित साधने लोकप्रिय होऊन त्यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होईल, असे ते म्हणाले. 200 किलोमीटरच्या या सायकल वॉकमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ उपक्रमाला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.