खारफुटीवरील मराठीतील पहिल्याच पुस्तकाचे ‘गोदरेज अँड बॉयस’कडून प्रकाशन
मुंबई, 5 मे 2021 : गोदरेज समुहातील प्रमुख कंपनी, ‘गोदरेज अँड बॉयस’ने “मेनी सिक्रेट्स ऑफ मॅनग्रूव्हज” या कथा पुस्तकाची मराठी आवृत्ती सादर करीत असल्याची घोषणा आज केली. खारफुटीवरील हे पहिलेच कथा पुस्तक आहे. प्रख्यात बालसाहित्यिका केटी बागली यांच्या सहकार्याने 2019 मध्ये ते प्रथम इंग्रजीमध्ये प्रकाशित झाले होते. ‘‘करामती खारफुटी’’ नावाची ही मराठी ई-आवृत्ती हे मराठीतील या विषयावरील पहिलेच कथा पुस्तक आहे. अद्भुत आणि नाजूक अशा खारफुटीच्या परिसंस्थेला...