Author: environmental news

कचरामुक्‍त मुंबई अभियानचे उद्घाटन

मुंबई  : दर महिन्‍यातील सर्व शनिवार – रविवार सहित किमान १० दिवस लोकसहभागातून व मुंबई पोलिसांच्‍या सहकार्याने महापालिकेव्‍दारे संयुक्‍त ‘ कचरामुक्‍त मुंबई अभियान’ राबविण्‍यात येणार आहे. या ‘ कचरामुक्‍त मुंबई अभियान’चे उद्घाटन महाराष्‍ट्र राज्‍याचे...

महाराष्ट्रातील वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ : सुधीर मुनगंटीवार; ३१२ वाघांची नोंद, व्याघ्रसंवर्धनात भरीव यश

मुंबई : राज्यात २०१४ साली १९० वाघ होते ते वाढून आता २०१९ मध्ये ३१२ इतके झाले असून ही वाढ अंदाजे  ६५ टक्के आहे, स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी जे प्रयत्न केले त्याचे  हे यश...

पर्यावरणप्रेमी शिवसेना; मरोळ परिसर हिरवागार करण्याचा निर्धार, ११०० रोपांची लागवड

मुंबई, (निसार अली): सिमेंट-काँक्रिटचे वेढलेला अंधेरी पूर्वेकडील मरोळ परिसर विविध प्रकारच्या फळझाडांनी हिरवागार करण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी मरोळ येथे महापालिकेच्या मैदानात वृक्षारोपणाचा...

 रत्नागिरीतील मजगाव येथे जुनाट वटवृक्ष कोसळला, सहा घरांचं नुकसान; मोठा अनर्थ टळला

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यात सोमवारी मजगाव येथे जुनाट वटवृक्ष कोसळल्याने सहा घरांचं नुकसान झालं आहे. या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याने मोठा अनर्थ टळला. रत्नागिरी तालुक्याला सोमवार 29 जुलै रोजी या पावसाचा फटका बसला आहे....

देशभरात वाघांची संख्या 2967 पर्यंत वाढली; हे ऐतिहासिक यश : पंतप्रधानांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : जागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी अखिल भारतीय व्याघ्र अनुमान सर्वेक्षणाच्या चौथ्या अंकाचे प्रकाशन केले. या सर्वेक्षणानुसार देशातल्या वाघांची संख्या 2967 पर्यंत पोहोचली...

’युनायटेड वे’ मुंबईचे मिशन मॅनग्रूव्हज; जागतिक खारफुटी दिनानिमित्त नेरूळमधील करावे येथे खारफुटींचे वृक्षारोपण

नवी मुंबई : पर्यावरणाचे संरक्षण करणार्‍या खारफुटीच्या झाडांमध्ये वाढ व्हावी, या उद्देशाने युनायटेड वे, मुंबई या संस्थेने मिशन मॆग्रुव्हज नावाचा प्रकल्प सुरू केला आहे. त्यानुसार कांदळवने वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. २६ जुलै ला जागतिक...

पालघरमधील शिरगावात कांदळवन स्वच्छता अभियान; सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग

पालघर : २६ जुलै हा दिवस जागतिक कांदळवन दिन म्हणून पाळण्यात येतो. या निमित्त विद्यार्थ्यांना कांदळवन किंवा खारफुटीचे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्व समजावे, या उद्देशाने पालघरमधील शिरगावात कांदळवन स्वच्छता अभियान राबविण्यात आली. प्राणीशास्त्र विभाग, सोनोपंत दांडेकर...

२६ जुलै जागतिक खारफुटी दिन म्हणून पाळला जातो; त्यांचे संवर्धन होणे महत्वाचे आहे

मुंबई : २६ जुलै हा दिवस जागतिक खारफुटी दिन म्हणून पाळला जातो. खारफुटीचे महत्व लक्षात घेता पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांचे संवर्धन, संरक्षण व्हावे, या उद्द्शाने युनेस्कोने २६ जुलै हा दिवस जागतिक खारफुटी संवर्धन दिन म्हणून...

संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदीने प्रवाह बदलला

रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे कोकणात दाणादाण उडवून दिली आहे. काही ठिकाणी जमीन खचतेय तर काही ठिकाणी जमिनीला भेगा पडल्यात. संगमेश्वर तालुक्यातील कोंड्ये-डावखोल गावावर सध्या निसर्गाचा प्रकोप पहायला मिळत आहे. निसर्गाने रौद्र रूप धारण केलं कि...

मुंबईच्या मिनी गोवा किनारपट्टीवरील पर्यावरण धोक्यात; प्लास्टीकचा खच, डांबरी गोळ्यांनी समुद्राचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण

मुंबई, (निसार अली) : मुंबईच्या पश्चिमेकडे मालाडजवळ असलेल्या समुद्र किनारपट्टीवरील पर्यावरण धोक्यात आले आहे. प्लास्टीकचा खच आणि डांबरी गोळ्यांनी समुद्राचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. यामुळे समुद्रातील जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. याबाबत पत्रकार...